मुख्य सामग्रीवर वगळा
यवतमाळ : पत्नीच्या आत्महत्या पाहताच पती पोलिस ने केले विष प्राशन.


यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर येथील पोलिस वसाहतीत पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांच्या पत्नीने घरगुती वादातून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली घरी परतलेल्या पतीने ही घटना पाहताच कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला ही घटना शुक्रवारी दिनांक 27 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
विष प्राशन केलेले पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांची प्रकुति चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. तर वर्षा शंकर राठोड (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शंकर राठोड हे पुसद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या शासकीय वाहनावर चालक आहेत. शंकर राठोड हे पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलिस वसाहतीत राहतात. शुक्रवार सकाळी त्यांचे पत्नीसोबत घरगुती वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शंकर राठोड घराबाहेर पडून पोलिस ठाण्यात आले. दरम्यान, काही वेळानंतर ते घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीने पंख्याला लटकवून घेतल्याचे चित्र दिसले. त्यामुळे भावनावेग अनावर होऊन
दुचाकीवरून ते थेट कीटकनाशकाच्या दुकानात गेले व अंदाजे 100 मिली एवढेविषारी औषध प्राशन करून पुतण्याला फोन केला. उलट्या सुरू झाल्याने शंकर राठोडची तब्येत बिघडली. पुतण्या प्रेम राठोडने लगेच त्याला पुसद येथीलच लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले होते. सदर घटनेची तपास पुसद शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमेश आत्राम करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...