मुख्य सामग्रीवर वगळा
विधानसभेसाठी यवतमाळ जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार मतदार

                                            (जिल्हाधिकारी अजय गुल्हाने)

  *निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

* 2499 मतदान केंद्रांवर होणार मतदान

यवतमाळ दि. 23 : 
मुकाबला वृतपत्र सेवा, 
संपादक: सैय्यद मुजीबोद्दीन

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार 205 मतदार असून 2499 मतदान केंद्रावर हे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.
जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 5333 आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, निवडणुकीच्या कामाकरीता सर्व मतदान केंद्रांवर एकूण 12 हजार 995 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सातही विधानसभा मतदार क्षेत्रासाठी जिल्ह्यात 4618 बॅलेट युनीट, 3429 कंट्रोल युनील आणि 3694 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. निवडणूकीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी डिजीटल प्लॅटफार्मचा उपयोग करण्यात येणार असून यासाठी सी-व्हीजील ॲप, एमसीसी पोर्टल, व्होटर हेल्पलाईन ॲप, पीडब्ल्यूडी ॲप आदींचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक संदर्भात माहिती देण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी म्हणाले, उमेदवाराने काय करावे किंवा काय करू नये, यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली आहे. आदर्शआचार संहितेचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. राज्य किंवा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारासाठी एक सूचक तर अपक्षांसाठी 10 सुचक असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम 10 हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 5 हजार रुपये आहे. उमदेवारांच्या खर्चाची मर्यादा 28 लक्ष रुपये असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
याशिवाय 2400 जिल्हा पोलिस, 1211 कर्मचारी, 850 होमगार्ड तसेच राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या 7 कंपन्या लागणार आहेत. आंतरजिल्हा व आंतरराज्य अशा एकूण 22 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता जिल्ह्यातील सात मतदारसंघात 2491 मतदान केंद्र असून आठ सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण 2499 मतदान केंद्र आहेत. यात 
76 – वणी मतदारसंघात 323 मतदान केंद्र,  
77 – राळेगाव मतदारसंघात 350 मतदान केंद्र, 
78 – यवतमाळ मतदारसंघात 412 केंद्र
79 –  दिग्रस मतदारसंघात 378 केंद्र,
80 – आर्णी मतदारसंघात 366 केंद्र, 
81 – पुसद मतदारसंघात 328 केंद्र
आणि 
82 – उमरखेड मतदारसंघात 342 मतदान केंद्रांचा समावेश आहे. 
पाच मतदान केंद्रांचे स्थलांतर करण्यात आले असून दिग्रस विधानसभा मतदारसंघातील 10 – व्हायली, आर्णि विधानसभा मतदारसंघातील 75 आणि 75 तसेच 151 आणि 152 पारडी नासकारी  मतदान केंद्राचा समावेश आहे.


विधानसभा क्षेत्रनिहाय जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात एकूण 21 लक्ष 72 हजार 205 मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 11 लक्ष 25 हजार 52, स्त्री मतदारांची संख्या 10 लक्ष 47 हजार 122 तर 31 मतदार इतर आहेत.

वणी मतदारसंघात 1 लक्ष 47 हजार 552 पुरुष मतदार आणि 1 लक्ष 36 हजार 945 स्त्री मतदार असे एकूण 2 लक्ष 84 हजार 497 मतदार,

राळेगाव मतदारसंघात 1 लक्ष 45 हजार 160 पुरुष, 1 लक्ष 38 हजार 29 स्त्रिया व इतर 1 असे एकूण 2 लक्ष 83 हजार 190 मतदार,

यवतमाळ मतदारसंघात 1 लक्ष 95 हजार 979 पुरुष, 1 लक्ष 88 हजार 139 स्त्रि मतदार व इतर 21 असे एकूण 3 लक्ष 84 हजार 139 मतदार,

दिग्रस मतदारसंघात 1 लक्ष 67 हजार 680 पुरुष, 1 लक्ष 54 हजार 673 स्त्री व इतर 02 असे एकूण 3 लक्ष 22 हजार 355 मतदार,

आर्णी मतदारसंघात 1 लक्ष 60 हजार 829 पुरुष, 1 लक्ष 51 हजार 164 स्त्री व इतर 03 असे एकूण 3 लक्ष 11 हजार 996 मतदार,

पुसद मतदारसंघात 1 लक्ष 54 हजार 334 पुरुष, 1 लक्ष 38 हजार 822 व इतर 02 असे एकूण 2 लक्ष 93 हजार 158 आणि

उमरखेड मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लक्ष 53 हजार 518, स्त्री मतदारांची संख्या 1 लक्ष 39 हजार 350 व इतर 02 असे एकूण 2 लक्ष 92 हजार 870 मतदार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्