पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत
पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत प्रतिनिधी/पुसद गेल्या दोन दिवसापासून पुसद तालुक्यात पावसाची हजेरी लागत आहे. अशातच वीज पुरवठा देखील वारंवार खंडित होत आहे. गेल्या दोन दिवसापासून गोविंदनगर, काकडदाती अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील परिसर श्रीरामपूरसह आदी भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना तर बकरी ईदचा दिवस विजेविना व अंधारातच साजरी करण्याची वेळ येत आहे.यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी ग्राहकाकडून आता होत आहे. पुसदच्या विज वितरण विभागाचे अभियंता यांच्याकडून नियोजनशून्य कारभाराचा वीज ग्राहकांना फटका बसत आहे. पुसद शहरातील व ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी कामाचा विसर पडल्यामुळे अनेक ठिकाणी डीपी जवळाल्याच्या व तार तुटल्याच्या घटना घडत आहे. वीज वितरण विभागाचे अभियंताकडून वीज वितरण विभागाने नियुक्त केलेल्या त्या ठेकेदाराला जाब सुद्धा विचारल्या...