कोरोना : वैद्यकीय महाविद्यालयात 500 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाचे नियोजन - पालकमंत्री संजय राठोड नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या तीन पॉझेटिव्ह नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ही बाब असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अभिनंदनास पात्र आहे. मात्र असे असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाही. त्यामुळे या आव्हानाचा सामना करण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाच्या पुर्वतयारीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. बाबा येलके, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंत...