मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
यवतमाळ : पत्नीच्या आत्महत्या पाहताच पती पोलिस ने केले विष प्राशन. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर येथील पोलिस वसाहतीत पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांच्या पत्नीने घरगुती वादातून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली घरी परतलेल्या पतीने ही घटना पाहताच कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला ही घटना शुक्रवारी दिनांक 27 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. विष प्राशन केलेले पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांची प्रकुति चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. तर वर्षा शंकर राठोड (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शंकर राठोड हे पुसद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या शासकीय वाहनावर चालक आहेत. शंकर राठोड हे पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलिस वसाहतीत राहतात. शुक्रवार सकाळी त्यांचे पत्नीसोबत घरगुती वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शंकर राठोड घराबाहेर पडून पोलिस ठाण्यात आले. दरम्यान, काही वेळानंतर ते घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीने पंख्याला लटकवून घेतल्याचे चित्र दिसले. त्यामुळे भावनावेग अनावर होऊन दुचाकीवरून ते थेट
विधानसभेसाठी यवतमाळ जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार मतदार                                             (जिल्हाधिकारी अजय गुल्हाने)   *निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज * 2499 मतदान केंद्रांवर होणार मतदान यवतमाळ दि. 23 :  मुकाबला वृतपत्र सेवा,  संपादक: सैय्यद मुजीबोद्दीन विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार 205 मतदार असून 2499 मतदान केंद्रावर हे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 5333 आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, निवडणुकीच्या कामाकरीता सर्व मतदान केंद्रांवर एकूण 12 हजार 995 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सातही विधानसभा मतदार क्षेत्रासाठी जिल्ह्यात
सण उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. पुसद / दिनांक : २ सेप्टेंबर आगामी श्री गणेश उत्सव, मोहरम व ईतर सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येणार आहे. सदर सण उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी दिनांक २ सेप्टेंबर रोजी मा.अप्पर पोलीस अधिक्षक नुरुल हसन यवतमाळ यांचे प्रमुख उपस्थितीत पुसद शहरातील मुख्य मार्गाने व वसंतनगर हद्दीत रुट मार्च घेण्यात आले आहे. सदर रुट मार्च करिता पुसद शहर चे ठाणेदार आत्राम साहेब, वसंतनगर चे ठाणेदार परदेशी साहेब, पुसद ग्रामीणचे ठाणेदार चौबे साहेब, वाहतुक शाखेचे इंचार्ज भंडारे साहेब व ईतर ५ पोलीस अधिकारी व २५६ कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी होते .