जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये
*जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी* *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून : शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...