जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी
जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी यवतमाळ जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी दिले आहेत. ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह सुरु राहतील. *2 जून पासून सुरू असलेल्या सेवा* १. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दु...