न.प.पुसद चे अग्नीदल अधिकारी जबाबदार असल्याने चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी पुसद नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करुन नविन अग्नशामक वाहन खरेदी करुन अग्नीदल प्रमुखाने देखरेखीत व इतर इमशन्सी कामासाठी उपयोग करण्या संबंधि सुपूर्द केले होते. परंतु संबंधित विभागाच्या इंजिनयरच्या हलगर्जीपणामुळे पुसदची नविन अग्नीशामक वाहन गेले ८ दिवासापासून नादुरुस्त आहे. व या विषयी संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे आरोप करुण मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदनात देण्यात आले आहे. तसेच इमर्जन्सी वाहनाची तात्काळ दुरुस्ती न करता सदर वाहनावर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुसद शहरापासून ३ कि. मी. च्या जवळ श्रीरामपूर हद्दीत धमनगर मध्ये ४-५ घरांना आग लागली होती. त्या प्रकरणी पुसदची अग्नीशामक घटनास्थळी न पोहचल्यामुळे गरीब लोकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. वाडतील लोकांनी घरातील पाणी पुरवठा करुन आगीवर नियंत्रण केले आहे. तेव्हा निवेदन कर्ते यांनी नगर परिषद पुसदची अग्नीशामक वाहन घटनास्थळी का आली नाही, याची चौकशी केली असता वाहन मागील ८ दिवसापासून नादरुस्त अस...